Trace Id is missing

Microsoft सेवा करारामधील बदलांचा सारांश – 30 सप्टेंबर 2024

आम्ही Microsoft सेवा करार अपडेट करत आहोत, जो Microsoft उपभोक्ता ऑनलाइन उत्पादने आणि सेवांच्या तुमच्या वापरास लागू होतो. हे पेज Microsoft सेवा करारामधील सर्वात लक्षणीय बदलांचा सारांश पुरवते.

सर्व बदल पाहण्यासाठी, कृपया येथे संपूर्ण Microsoft सेवा करार वाचा.

  1. हेडरमध्ये, आम्ही प्रकाशनाची तारीख 30 जुलै 2024 आणि लागू होण्याची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी अपडेट केली आहे.
  2. सेवा आणि समर्थन वापरणे विभागामध्ये, नियंत्रण आणि अंमलबजावणी विभागात आम्ही स्पष्टतेसाठी आणि वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आमच्या बाह्य धोरण पेजवर एक लिंक जोडली आहे.
  3. सेवा-विनिर्दिष्ट अटी या विभागामध्ये, आम्ही पुढील भर घातली आहे आणि बदल केले आहेत:
    • Xbox विभागामध्ये, आम्ही स्पष्ट केले आहे, की Xbox नसलेल्या तृतीय-पक्ष प्लॅटफॉर्मना Xbox Game Studio शीर्षके प्ले करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा आशय आणि डेटा शेअर करावा लागू शकतो व हे तृतीय पक्ष प्लॅटफॉर्म त्यांच्या अटींच्या अधीन राहून, तुमचा डेटा ट्रॅक आणि शेअर करू शकतात. आम्ही Xbox वर लहान मुले उपविभागामध्ये स्पष्ट केले आहे, की तृतीय पक्ष प्लॅटफॉर्मवर Xbox Game Studio शीर्षके अ‍ॅक्सेस केली जातात, तेव्हा कुटुंब सेटिंग्ज वैशिष्ट्ये कदाचित उपलब्ध नसतील. आम्ही स्पष्ट केले आहे, की काही Xbox सेवा यांच्या स्वतःच्या वापर अटी आणि आचारसंहिता असू शकतात.
    • Microsoft Family ची वैशिष्ट्ये विभागामध्ये, आम्ही स्पष्ट केले आहे, की ही वैशिष्ट्ये केवळ Microsoft सेवांसाठी आहेत आणि ती कदाचित इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसतील.
    • Microsoft Cashback: प्रोग्रामचे वर्णन करण्यासाठी व प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी Cashback अटी आणि नियम यांची स्वीकृती आवश्यक आहे हे कन्फर्म करण्यासाठी, आम्ही Microsoft Cashback प्रोग्राममध्ये एक विभाग जोडला आहे.
    • Microsoft Rewards विभागामध्ये, Rewards डॅशबोर्ड वर पॉइंटवर दावा कसा करावा हे स्पष्ट करण्यासाठी आम्ही शब्दावडंबर जोडले आहे आणि पॉइंट फक्त अस्सल सद्भावना असलेल्या वैयक्तिक संशोधनांच्या उद्देशांनी वापरल्या जाणाऱ्या शोधांसाठी दिले जातील.
    • Copilot AI अनुभव सेवांचा वापर संचालित करणारे अटी आणि नियम कन्फर्म करण्यासाठी आम्ही एक विभाग जोडला आहे.
    • साहाय्यक AI, आशयाची मालकी, आशयाची क्रेडेन्शियल आणि तृतीय पक्षाच्या दाव्यांबाबत स्पष्टता जोडण्यासाठी, आम्ही AI सेवांवरील विभाग अपडेट केला आहे.
  4. संपूर्ण अटींमध्ये, स्पष्टतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि व्याकरण, मुद्रणदोष व त्यांसारख्या समस्या हाताळण्यासाठी, आम्ही बदल केले आहेत. आम्ही नामकरण आणि हायपरलिंकदेखील अपडेट केल्या आहेत.